आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर घसरले   

प्रति पिंपाचा दर दोन डॉलरने घटला 

हाँगकॉग : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर प्रति पिंप दोन डॉलरने सोमवारी घसरले. तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक यांनी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे दरात घट झाली असल्याचे मानले जात आहे. 
 
अमेरिकेचा क्रूड ऑइल निर्देशांक २.२१ डॉलरने घसरला. प्रति पिंपाचा दर ५६.०८ डॉलर एवढा झाला. ब्रेंट क्रूडचा दर २.१४ डॉलरने घसरून ते प्रति पिंप ५९.१५ डॉलर एवढे झाले. दरम्यान, ओपेक  संघटनेतील आठ देशांनी क्रूड ऑइलचे उत्पादन १ जूनपासून प्रति दिवस ४ लाख ११ हजार पिंपांनी वाढवण्यात येईल, असे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत क्रूड तेलाचे दर सुमारे २० टक्के कमी झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे  अमेरिकेला स्वस्त उर्जेचा चाहता आहे. आखातातील तेल उत्पादक अमेरिकेच्या सुरक्षा हमीसमोर झुकत आले आहेत. ओपेकमधील अनेक देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणानुसार वागत आहेत. त्याचे परिणाम क्रूड तेलाचे दर घसरण्यावर झाले असल्याचे मानले जात आहे. जगभरात होणारी युद्धे केवळ क्रूड तेलाच्याकिंमतीवर अवलंबून असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले आहे. तेलाचे दर कमी झाल्यास युद्धे संपुष्टात येतील, असा त्यांचा अंदाज आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे तज्ज्ञांंचे मत आहे.
 

Related Articles